मांटुगा परिसरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार यांची सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. करोनाचं संकट असताना या मुलांकडनं चहा घ्यायचा का असं विचार मनात घोंगावत असतानाच त्यांनी मुलाची आपुलकीनं चौकशी केली. मार्च महिन्यात वडील वारल्यानंतर सागरनं आपल्या वडिलाचं कॅन्टीन पुढं सुरु ठेवलं आहे. घरात आई आजारी आहे त्यामुळं लॉकडाऊनमध्ये तो स्वतः चहा विकतोय आणि रोज २०० रुपये मिळवतोय. तसंच, आता शाळा सुरु झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं ही द्यायचं आहे. सागरच्या या परिस्थितीत ओंकार यांनी त्याला मदतीचा हात दिला आहे.
पुढे काय करायचंय? असा प्रश्न विचारला असताना सागरनं तुमच्यासारखं पोलिस व्हायचंय असं चटकन उत्तर दिलं. त्यानंतर ओंकार यांनी सागरला दहावीची पुस्तक आणि वह्या घेऊन दिल्या. तसंच, अभ्यासाकरिता काही अडचण आल्यास मला संपर्क कर असं आश्वासनं देऊन आपला फोन नंबरदेखील दिला.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री यांनीही ओंकार यांचे कौतुक केलं आहे. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते, जिद्द तेव्हाचं जन्माला. पोलिस दलातील संवेदनशील पोलिस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी केलेल्या या कामाचं मला खूप कौतुक वाटतं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times