Nagpur Crime News : सोशल मीडियावर चमकोगिरी करुन युवकांना कमाईचा मंत्र देणारा कथित सोशल मीडियातज्ञ अजित पारसे (Ajeet Parse) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला. पारसे याने बडकस चौक येथील एका होमिओपॅथी डॉक्टरला तब्बल साडेचार कोटी रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले होते. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.

फिर्यादी डॉक्टर राजेश मुरकुटे यांच्या तक्रारीनंतर अजित पारसे विरुध्द कलम भा.द.वि 384,420,465,467,468,471 नुसार  गुन्हा दाखल झाला केला होता. त्यानंतर प्रकरण गुन्हे शाखा यांच्या कडे वर्ग करण्यात आला होता.अजित पारसे यांच्या घराची आणि कार्यलयाची झडती घेतली असता राजमुद्रा असलेले शिक्के ,पोलीस, बॅंक, पोलीस स्टेशन ,आयकर विभागचे शिक्के, तसेच शासकीय कार्यलयाचे बनावट लेटरपॅड व शिक्के व सापडले होते. 
 
फसवणूक प्रकरणात आरोपीचा विरुध्द प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कम बाबत थेट व्यवहार दिसत असल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज खारीज करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आला. यावर  न्या. जि.पी.देशमुख यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात सरकाराची बाजू ॲड. अभय जिकार यांनी मांडली. तर आरोपी तर्फे ॲड. कमल सतुजा यांनी युक्तीवाद केला.

काय आहे प्रकरण…

  • अजित पारसे विरुद्धची पहिली तक्रार महाल येथील डॉ. मुरकुटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर सर्व प्रकरण समोर आले होते.
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पारसेच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. सोबतच त्याच्या महागड्या दुचाकीसह नऊ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या.
  • रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस घरी धडकल्यापासून पारसेने आपल्या हातावर चाकूने कापण्याचे प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.
  • पारसेच्या सहा बँक खात्याचे पासबुक पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचे लॉकरही सील करण्यात आले असून लवकरच लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे.
  • पारसेविरुद्ध तक्रार करण्यासाठी 20 पेक्षा अधिक डॉक्टर आणि व्यावसायिक पोलिसांना भेटले असून, पोलीस त्यांच्या लेखी तक्रारींची वाट पाहत आहेत.

अटक टाळण्यासाठी वैद्यकीय कारणांचा आधार…

news reels

अजितने वारंवार आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवस तो व्यसनमुक्ती केंद्रातही होता. पारसेला अटक करुन न्यायालयीन कोठडीअंतर्गत त्याची कारागृहात रवानगी करा. तो खरंच आजारी असेल तर नियमानुसार, त्याचा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार करा, अशी मागणीही करण्यात आली. मात्र याकडेही पोलिसांनी लक्ष दिले नव्हते. विविध आमिषे दाखवून तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याने सात डॉक्टरांसह सुमारे 15 जणांना 50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा गंडा घातल्याची चर्चा होती. गुन्हा दाखल होऊन चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्याला अद्याप अटक झाली नाही, हे विशेष. पोलिसांकडून (Nagpur Police) प्रत्येक प्रकरणात आरोपींना इतकी सवलत देण्यात येते का असा प्रश्नही याठिकाणी अनेकांनी उपस्थित केला होता.

ही बातमी देखील वाचा…

नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी; शिक्षक मतदारसंघासाठी चौथाही उमेदवार रिंगणात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here