Pune Baby Kidnap :  पुणे स्टेशनवर आई दारूच्या (Pune crime) नशेत असताना एका व्यक्तीने सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून मुलाची सुटका केली आहे. इक्बाल हसन शेख (वय 32, रा. पेडगाव, कोल्हापूर) असे अपहरणकर्त्याचे नाव असून तो सध्या कर्नाटकमधील गुलबर्गा रेल्वे स्टेशनजवळ राहतो. 

एका 40 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपरी येथील रहिवासी आहेत. तिला दारूचे व्यसन आहे. 9 जानेवारी रोजी ती आपल्या सहा वर्षाच्या मुलासह पुणे स्टेशनवर आली होती. तिथे तिची इक्बाल शेखशी ओळख झाली. फिर्यादीने त्याच्यासोबत दारू प्यायली. काही वेळातच रात्री 11 वाजता नशेमुळे तिला झोप लागली. त्यानंतर पहाटे 2 वाजता तिला जाग आली तेव्हा मुलगा सोबत नसल्याचं तिला समजलं. तिने बंडगार्डन पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक संशयित सापडला.अपहरणकर्त्याने मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. गुलबर्गा पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करून मुलाला ताब्यात घेतले आहे.आरोपीला पकडण्यासाठी बंड गार्डन पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. शेखने मुलाचे अपहरण का केले ते पुढील तपासानंतर समोर येईल.

पुणे स्टेशनवर बालकं असुरक्षित ?

मागील महिन्यात देखील पुणे स्टेशनवरुन बाळाचं अपहरण झालं होतं. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालं होतं.  अडीच वर्षाच्या बालकाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आलं होतं. अपहरण झाल्यानंतर 12 दिवसांनी बालकाचा शोध लागला. या प्रकरणात एका महिलेसह दोघांना  अटक करण्यात आली होती. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं होती. 10 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अडीच वर्षांचे बालक भूपेश भुवन पटेल याचं अपहरण झालं होतं. पटेल दाम्पत्य पुण्यात उदरनिर्वाहासाठी आले होते. मूळचे झारखंडचे असलेले पटेल दांपत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे निघाले होते. या घटनांमुळे पुणे स्टेशनवर बालकं असुरक्षित आहेत का?,असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here