13th January Headlines: एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत. एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीला घेऊन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांचे आंदोलन असणार आहे.

त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले होणार

त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले होणार आहे, सकाळी 7 वाजल्यापासून. 5 जानेवारीपासून मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद होते. शिवलिंगला वजर्लेप लावणे, गर्भगृहला चांदीचा दरवाजा बसवणे, सभामंडपमध्ये स्टेनलस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यात आले आहे.

नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेची आजपासून उच्चस्तरीय चौकशी

news reels

नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेची आजपासून उच्चस्तरीय चौकशी सुरु होणार आहे. 1 जानेवारीला ही घटना घडली होती. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू तर 22 कामगार यात जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे जाहीर केले होते. सकाळी 11 वाजता ही समिती कंपनीत दाखल होणार आहे.

भायखळा जिल्हा कारागृह राज्यात पहिली नर्सरी सूरू होणार

मुंबई – मुंबईतील महिला कारागृहात लहान मुलांसाठी भायखळा जिल्हा कारागृह राज्यात पहिली नर्सरी सूरू होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 12.45 वाजता सुरू होणार आहे. 

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
 
मुंबई – राष्ट्रावादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी दिलंय हायकोर्टात आव्हान.

बाईक टॅक्सीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी

मुंबई – बाईक टॅक्सीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी. राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यात चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलीय. धोरण आणि नियमावली कधी तयार होणार याची निश्चित माहिती नसताना, परवानगी नाकारणं अयोग्य आहे. असं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय. राज्यात बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते. 

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धां,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
 
पुणे – 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धांच्या समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे, दुपारी 4 वाजता.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस

श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज यन्नीमज्जन, तैलाभिशेक सोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 नाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. पूजा झाल्यानंतर नगरप्रदिक्षणेस सुरुवात होते. यावेळी श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर केला जातो.  हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. तेथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा केली जाते. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व 68 लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here