वॉशिंग्टन : सूर्यावर वारंवार भयानक स्फोट होत असल्याचं समोर आलं आहे. आता पुन्हा एकदा सूर्यावर एक नवीन सनस्पॉट तयार होत असून यामुळे शक्तिशाली एक्स क्लास फ्लेअर होत असल्याची माहिती आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे एकाच आठवड्यातील हा तिसरा एस्क सोलर फ्लेअर आहे. १० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.५७ वाजता सूर्यापासून एक धोकादायक प्लेअर तयार झाल्याची माहिती नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेकडून देण्यात आली आहे. spaceweather.com च्या मते या स्फोटामुळे अवकाशामध्ये मोठे रेडिएशन पसरले होते, त्यामुळे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात देखील एक चमकदार वस्तू पाहायला मिळाली. इतकंच नाही तर दक्षिण पॅसिफिक प्रदेशांमध्ये देखील रेडिओ ब्लॅकआऊट झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, सोलर फ्लेअर्सला आकाराच्या आधारावर वेगवेगळे केलं जातं. X कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त शक्तिशाली फ्लेअर्स मानले जातात. त्यांची ताकद १ ते १० च्या स्केलवर दर्शवली जाते. दरम्यान, १० तारखेला पाहिला गेलेला फ्लेअर्स X1.09 आहे जो सर्वात धोकादायक फ्लेअर असल्याचं बोललं जातं. खरंतर, सूर्याने गेल्या काही दिवसांमध्ये सनस्पॉटमधून अनेक शक्तिशाली फ्लेअर्स उडवले आहेत. जेव्हा सूर्य आपली २५ वर्षांची चक्रं पूर्ण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये अशा क्रिया वाढतात अशी ही माहिती शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. तर शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, २०२५ हे नजीक असल्यामुळे सूर्यामध्ये हे बदल होत असावेत.

५० हजार वर्षात पहिल्यांदा आकाशात अनोखा नजारा दिसणार, १ फेब्रुवारीला रात्रीचा दिवस होणार?
पृथ्वीवर कसा आदळला सोलर फ्लेअर?

जेव्हा सुर्याच्या कक्षेमध्ये चुंबकीय ऊर्जा तयार होते तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर येतात आणि त्यालाच सोलर फ्लेअर असं म्हटलं जातं. M आणि X क्लास सोलर फ्लेअर हे सगळ्यात शक्तिशाली असून यामुळे पृथ्वीवरील रेडिओ ब्लॅकआऊट होऊ शकतात. जेव्हा X1.09 क्लासचा सोलर फ्लेअर पृथ्वीवर आदळला तेव्हा रेडिओ ब्लॅकआऊट झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकाशाचा वेग इतका मोठा होता की हे रेडिएशन अवघ्या आठ मिनिटांमध्ये पृथ्वीवर पोहोचले होते.

पृथ्वीवरील रेडिओ ब्लॅकआऊट

सूर्याकडून आलेल्या या रेडिएशनमुळे पृथ्वीवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाजवळील दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये रेडिओब्लॉक झाल्याची माहिती आहे. सोलर फ्लेअर व्यतिरिक्त सूर्यातून कोरोनाल मास इंजेक्शन किंवा CME देखील बाहेर पडतो. हे सूर्यातून प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्रातून येतात. जर CME स्फोट झाला तर पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फिअरला मोठं नुकसान होऊ शकतं. अशात जो स्फोट १० तारखेला झाला त्यामध्ये CME नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मोठी बातमी, अमेरिकेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प, विमानतळांवर हजारो लोक अडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here