नवी दिल्ली : आठवड्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलांच्या (Crude) किंमतीमध्ये हलकीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या आठवड्यामध्ये ६ टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलामध्ये वाढ झाली आहे. चीनमध्ये मागणी वाढल्यामुळे आणि अमेरिकी फेड रिझर्व्हच्या (US Fed Reserve) व्याजदरांवर परिणाम झाल्यामुळे हा चढ-उतार सुरू आहे. जगातली दुसरी सगळ्यात मोठी इकॉनोमी असलेला देश चीन कच्च्या तेलांवरील खरेदी-विक्री वाढवत आहे. चीनने तब्बल तीन वर्षानंतर यासंबंधी हालचालींना सुरुवात केली. याआधी कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे या व्यवहारांवर बंदी घातली होती. पण आता पुन्हा एकदा चीनने इंधनाच्या आयात-निर्यातीला सुरुवात केली आहे.

काय आहेत तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर…

नवी दिल्लीमध्ये पेट्रोल – ९६.७२ डिझेल – ८९.६२

मुंबईमध्ये पेट्रोल – १०६.३१ डिझेल – ९४.२७

कोलकातामध्ये पेट्रोल – १०६.०३ डिझेल – ९२.७६

चेन्नईमध्ये पेट्रोल – १०२.६३ डिझेल – ९४.२४

नोएडामध्ये पेट्रोल – ९६.७९ डिझेल – ८९.९६

सूर्याने पृथ्वीचं टेन्शन वाढवलं! आठवड्यातलं तिसरं भयानक वादळ, पृथ्वीवर ८ मिनिटांत आदळलं आणि…
दररोज सकाळी ६ वाजता बदलतात भाव…

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये एक्साइज ड्यूटी, डिलर कमिशन, व्हॅट आणि इतर दर जोडून रोजचा भाव ठरवला जातो.

कसे जाणून घेणार तुमच्या शहरातले दर…(How to check diesel petrol price daily).

इंधनांचे दर तुम्ही रोज SMS द्वारेही मिळवू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP आणि तुमच्या शहराचा कोड टाइप करून ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. जर तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून तुमच्या शहर कोड ९२२३११२२२२ टाइप करून माहिती मिळवू शकता आणि तुम्ही जर HPCL ग्राहक असाल तर HPPprice आणि शहर कोड ९२२२२०११२२ वर पाठवून दर जाणून घेऊ शकता.

श्रीमंतांच्या यादीत झाला मोठा फेरबदल; वाचा कोणाच्या संपत्ती झाली घसरण आणि वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here