Nashik Accident News Updates : नाशिकमधील (Nashik NewS) पाथरेजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. 

सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi Highway) पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

news reels

बसमधील असंख्य प्रवासी जखमी असून जखमींना सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शिंच्या  सांगण्यावरून चार ते पाच जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Accident: बस आणि ट्रकची धडक, वाहानांचा चक्काचूर; नाशिकमध्ये भीषण अपघात

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here