जयपूर : राजस्थानात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील बेबनावामुळे राज्यातील राजकीय वातावरण तंग झालंय. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून प्रश्न विचारत, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर कुरघोडीचा प्रयत्न केलाय. सोबतच, होता कामा नये, संविधानिक मर्यादेच्यावर कुणालाही स्थान नाही, असंही त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना उद्देशून म्हटलंय.

वाचा :

वाचा :

वाचा :

‘दबावाचं राजकारण नको’

‘जर तुम्ही आणि तुमचं गृह मंत्रालय राज्यपालांचं संरक्षण करू शकत नाही तर राज्यातील कायदे-व्यवस्थेचं काय? राज्यपालांच्या सुरक्षेसाठी एखाद्या एजन्सीशी संपर्क करायला हवं? मी कधीही कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं वक्तव्य करताना ऐकलेलं नाही. ही एक चुकीच्या प्रवृत्तीची सुरुवात नाही का? जिथं आमदार राजभवनात येऊन आपलं विरोध प्रदर्शन करतात?’ असं कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

दरम्यान राज्य सरकारद्वारे २३ जुलै रोजी रात्री विधानसभेचं सत्र अगदीच कमी वेळेची नोटीस देत बोलावण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. या पत्राची समिक्षा करण्यात आली तसंच कायदेतज्ज्ञांचंही मत विचारात घेतलं गेलं, असंही राज्यपालांनी म्हटलंय.

मी विधानसभा सत्रासंबंधी तज्ज्ञांनी चर्चा करण्याआधीच तुम्ही सार्वजनिक रुपात असं वक्तव्य केलंत की राजभवनाला घेराव घातला गेला तर ही माझी जबाबदारी राहणार नाही, असाही टोला मिश्र यांनी गेहलोत सरकारला लगावलाय.

राज्यपाल केंद्राच्या दबावाखाली, काँग्रेसचा आरोप

दुसरीकडे राजभवनात काँग्रेसच्या गेहलोत गटानं आज दिवसभर केलेलं आंदोलन सायंकाळी ७.४० वाजता संपवलं. काँग्रेसच्या आमदारांसोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी राजभवनात आंदोलन सुरू केलं होतं. गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. राज्यपालांकडून केंद्र सरकारच्या दबावाखाली बहुमत चाचणी रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केलाय.

दरम्यान, आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत, असं सांगत मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्या १०२ आमदारांची याची राज्यपालांकडे सोपवलीय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here