Nashik Sinnar Accident : नाशिक-शिर्डी महामार्गावर (Nashik Shirdi Highway) आज पहाटे वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाशिक शिर्डी महामार्गावर (sinnar Shirdi Highway) झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरेजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Major Accident) झाल्याची घटना आज सकाळी घडली. या भीषण अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

दरम्यान सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi Highway) पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भयानक अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात एवढा भीषण होता कि बसचा चुराडा झाला आहे. एका बाजूने बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले. एकूणच नाशिक शहरासह जिल्ह्यातील आपघातांचे सत्र सुरूच असून यंदाच्या वर्षांतील सर्वात भयानक अपघात म्हणावा लागणार आहे. 

news reels

पाहा व्हिडीओ : Nashik Accident : Sinnar Shirdi मार्गावर भीषण अपघात, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक

नेमका अपघात कसा घडला… 

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. बसमधील जवळपास दहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून काही प्रवासी जखमी आहेत. त्यांच्यावर सिन्नर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Accident: बस आणि ट्रकची धडक, वाहानांचा चक्काचूर; नाशिकमध्ये भीषण अपघात

1 COMMENT

  1. Ι’ѵe аlways experienced issues ᴡith exchanges until I met Quantum
    Αi, and sіnce I startedd usіng tһe platform
    Ι’vе continued to use it. What I lіke аbout Quantum іs the way it responds
    to concerns. They r spend time and trеat everʏbody with sօ mmuch respect.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here