Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल 27 उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. काल, गुरुवारी (12 जानेवारी) शेवटच्या दिवशी भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार, बसपाच्या नीमा रंगारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार, आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखेडे आदी प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

नागारोव गाणार यांच्यासह आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, माजी महापौर कल्पना पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बसपाच्या नीता रंगारी यांच्यासोबत प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव विजय डाहाट, जितेंद्र घोडेस्वार, सुरजभान चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्यावतीने इटकेलवार यांच्यासोबत शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी…

रामराव चव्हाण, सुधाकर अडबाले, मत्यूंजय सिंग, राजेंद्र झाडे, अजय भोयर, दीपराज खोब्रागडे, सुषमा भड, रविंद्र डोंगरदेव, बाबाराव उरकुडे, विनोद राऊत, सतीश जगताप, नरेंद्र पिपरे, गंगाधर नाकाडे, नागो गाणार, श्रीधर साळवे, सतीश इटकेलवार, उत्तमप्रकाश शहारे, नीलकंठ उइके, राजेंद्र बागडे, देवेंद्र वानखेडे, नीमा रंगारी, सचिन काळबांडे, प्रवीण गिरडकर, अतूल रुईकर, मुकेश पुडके, संजय रंगारी, नरेश पिल्ले या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. 

इटकेलवार बॅकफूटवर?

महाविकास आघाडीने नाकाडे यांना समर्थन जाहीर केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यांनीच नाकाडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे इटकेलवार यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार असल्याची चर्चा आहे.

news reels

16 जानेवारीपर्यंत गोंधळ

भाजप समर्थित शिक्षक परिषद असो, शिक्षक भारती वा शिक्षक सेना या संघटनांच्या पाठबळावर आणि वैयक्तिक संबंधांच्या भरवशावर ही निवडणूक जिंकू, असा विश्‍वास उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सतीश इटकेलवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत चाललंय तरी काय, या प्रश्‍नाचे उत्तर आता 16 जानेवारीला अर्ज परत घेण्याच्या दिवशी माहिती होणार आहे. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिल्यानंतरही राष्ट्रवादीकडून सतीश इटकेलवार यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली, हा संदेश सर्वत्र गेला आहे. 

ही बातमी देखील वाचा…

Teachers Constituency Elections : नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी; शिक्षक मतदारसंघासाठी चौथाही उमेदवार रिंगणात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here