वाचा:
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री , रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. , सिंधुदुर्गचे पालकमंत्री , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाचा:
या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत अशोक चव्हाण यांना अवगत केले व दुरूस्तीसंदर्भात अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करून प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते व पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करून सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी. पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामे देखील विहीत कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत, त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असतो. आता गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस उरले आहेत. यंदा करोनाचं संकट असल्याने दरवर्षीचा उत्साह नसला तरी मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणातील आपल्या मूळगावी जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर बैठकांवर बैठका सुरू आहेत. कोकणात जाण्यापूर्वी करोना चाचणी केली जाणार का?, ई-पासची अट रद्द केली जाणार का?, क्वारंटाइन कालावधी किती दिवसांचा असणार?, एसटी व रेल्वेच्या विशेष गाड्या सोडणार का?, असे अनेक प्रश्न अजूनही अनुतत्तरित आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीसाठी झालेली आढावा बैठक महत्त्वाची ठरली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times