Nashik News : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत मोठी घडामोड घडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Natole) यांनी तांबे पिता पुत्रांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने (Maharashtra Congress) महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे. 

नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Padvidhar Election) मोठा ट्वीस्ट काल पाहायला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ऐनवेळी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावर काँग्रेस सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole News) यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. तर डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने दिल्लीतील हाय कमांडकडे मागणी केली आहे. 

दरम्यान, नाशिक निवडणुकीत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती हायकंमाडला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी काँग्रेस कडून पाहिजे अशी कोणतीही मागणी नव्हती. मात्र सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने उमेदवारी फॉर्म हा कोरा दिलेला होता. त्यामुळे सुधीर तांबे यांना निवडणूक लढवायची नव्हती, तर सत्यजित तांबे यांचेही नाव टाकण्यास पक्षाची हरकत नव्हती, अस कांग्रेसच्या एका मोठया नेत्याने म्हटलं आहे. तांबे कुटुंबीयांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे करण्यात  आल्याचे समजते आहे. 

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील तांबे पिता पुत्रावर जोरदार हल्ला करत भाजप घर फोडण्याचे काम असल्याचा आरोपही केला आहे. नाना पटोले यांनी सकाळी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले म्हणाले कि, काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाला फसवलं असल्याचे नाना पटोले म्हणाले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे पटोले म्हणाले. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली. भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.

news reels

पाहा व्हिडीओ : Nana Patole on Satyajeet Tambe : Sudhir Tambe यांनी Congress ला फसवलं, सत्यजीत तांबेंना पाठिंबा नाही

डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई होणार का?

नाशिक प्रकरणावरून डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिल्लीतील हाय कमांडकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशची मागणी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. नाशिक निवडणुकीत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती हायकंमाडला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी काँग्रेसकडून पाहिजे अशी कोणतीही मागणी केली नव्हती. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने उमेदवारी फॉर्म हा कोरा दिलेला होता. त्यामुळं सुधीर तांबे यांना निवडणूक लढवायची नव्हती तर सत्यजित तांबे यांचेही नाव टाकण्यास पक्षाची हरकत नव्हती असं काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं म्हटलं आहे. तांबे कुटुंबीयांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा आरोप आहे. त्यामुळं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik MLC Election: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 29 उमेदवार रिंगणात; भाजपाचे तीन उमेदवार? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here