Nagpur Crime News : नोव्हेंबरपासून नागपूर शहरातील कुख्यात गुंड आणि टोळीतील सदस्य मोठ्या प्रमाणात संचित रजेवर तुरुंगाबाहेर आले आहेत. यामध्ये जामीनावर सुटलेल्या मोक्कामधील आरोपींचाही समावेश आहे. मात्र शहरात मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस (Nagpur Police) प्रशासन अपयशी होत असल्याचे गेल्या दोन आठवड्यांपासून दिसून येत आहे. नववर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 5 जणांचा खून झाला आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेण्यासाठी शहरातील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी बीट मार्शलच्या माध्यमातून सर्व्हिलन्स ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसात सातत्याने होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे या गुन्हेगारांवरील पोलिसांचे सर्व्हिलन्स सुटल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील टोळीयुद्ध संपवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोक्का आणि स्थानबद्धतेच्या कारवाईचा सपाटा लावला होता. त्यातून शहरातील कुख्यात गुंड आणि टोळीतील सदस्यांना अटक करीत, मोक्काची कारवाई केली. त्यातून शहरातील अनेक कुख्यात कारागृहात शिक्षा भोगत होते. याशिवाय वस्त्यांसाठी धोकादायक असलेल्या अनेक कुख्यात गुंडांना शहरातून हद्दपार करण्यासह सुरुवात केली होती.

त्यातून अनेक गुंड गावाबाहेर होते. मात्र, दीड महिन्यापूर्वीच मोक्का (Maharashtra Control of Organized Crime Act) गुन्ह्यातील 36 तर प्रतिबंधात्मक कारवाईतील (Preventive action) 56 गुन्हेगार बाहेर आले. या व्यतरिक्त काही गुन्हेगार शहरात अद्यापही सक्रिय आहेत. त्यातून शहरात पुन्हा टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी कारवाया सुरु होऊ नये यासाठी शहर पोलीस कटीबद्ध आहेत यासाठी पोलीस आयुक्तांनी योजना आखली होती. यानुसार गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गुन्हेगाराच्या घरी, परिसरात आणि वस्त्यांमध्ये बीट मार्शलच्या माध्यमातून दररोज भेट देऊन विचारपूस करत, कोण काय करत आहे, कुठे जातात आणि कुणाशी भेटतात यावरही नजर ठेवली जात होती.

टोळीयुद्धाने वाढवले पोलिसांचे टेन्शन

विशेष म्हणजे खून आणि टोळीयुद्धात (clashs between criminals) सहभागी असलेल्या गुंडांना दररोज सायंकाळी पोलिस ठाण्यात भेट द्यावी असे सांगितले होते. मात्र, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच खुनांनी शहर हादरले. यापैकी पाचपावलीतील दोन खून आणि कळमना, सक्करदरासह बुधवारी मध्यरात्री अजनी येथे झालेल्या खुनाने खळबळ उडाली. यात असलेल्या गुंडांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे असल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या सर्व्हिलन्सवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

news reels

ही बातमी देखील वाचा…

Teachers Constituency Elections : आमदारकीसाठी 27 शिक्षकांची तयारी; महाविकास आघाडीमधील ट्विस्टची चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here