Nagpur News : नवीन वर्षातच एसटी महामंडळाच्या (MSRTC) वाहकांना दिलासा मिळालेला नाही. एसटीतून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना जेव्हा ते तिकीट देण्याची वेळ असते, त्याच वेळी मशीन हँग होत असते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यास वेळ लागतो. काही वेळा मशीन बंद करुन पुन्हा सुरु करण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अशावेळी बसमध्ये वाहकाला चांगलीच ‘सर्कस’ करावी लागते. गेल्या एक वर्षापासून ही समस्या कायम आहे. मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. एसटीतील मशीन ‘हँग’ होत असल्याने नव्या मशीन मागवण्याची मागणी केल्या जात आहे. मात्र कोणतीही सुनावणी होत नसल्याने वाहक संतप्त झाले आहेत. 

मशीन बंद पडण्याची समस्या

एसटी महामंडळाकडून गेल्या अनेक दिवसांपासून ईटीआय (ETI) मशीन खरेदीची चर्चा सुरु असून, त्यात नागपूरसाठी 200 मशीन खरेदी करण्याचे बोलले जात आहे, मात्र अद्यापही या एकही मशीन उपलब्ध झालेले नाही. एसटीचे संबंधित अधिकारी याप्रकरणी गंभीर नसल्याचे लक्षात येते. मशीन बंद पडण्याची समस्या तितकीशी गंभीर नसल्याचे उत्तर महामंडळाकडून दिले जाते. नियमितपणे देखभालीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही समस्या कायम आहे. 

क्वॉलिटीच्या मशीन हव्यात

कोणत्याही समस्येबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यावर ते गांभीर्याने न घेता कानाडोळा करत असल्याचे बस वाहकांचे मत आहे. या प्रकरणी एसटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. महामंडळाच्या मुख्यालयातून चांगल्या मशीनचा पुरवठा झाल्यास हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. सर्वच डेपोमध्ये दर्जेदार उत्तम क्वॉलिटीच्या मशीन उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. नागपूरसह काही डेपोत मशीन पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिकीट फाडून द्यावी लागत आहे.

चार्जिंगनंतर कमी वेळात बंद 

गतवर्षी ईटीआय (ETI) मशीनच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाली होती. एसटी कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार मशीन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही ते एक-दोन तास चालत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी बॅटरी बदलून मशीन चालवण्याचा प्रयत्न केला. यानंतर एसटी महामंडळानेही काही मशीनच्या बॅटऱ्या बदलल्या. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता मशीन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. त्यामुळे ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी वाहकांनी केली आहे.

news reels

ही बातमी देखील वाचा…

आमदारकीसाठी 27 शिक्षकांची तयारी; महाविकास आघाडीमधील ट्विस्टची चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here