मुंबई: ‘महाराष्ट्रातील सरकारचं नेतृत्व माझ्याकडे आहे हा एक भाग आहे. पण हे सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर अपक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्याहीपेक्षा जास्त हा प्रयोग ज्यांनी स्वीकारला, त्या मायबाप जनतेचं सरकार आहे,’ असं मुख्यमंत्री यांनी आज शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केलं. (‘s interview in Shivsena mouthpiece Saamana)

ज्येष्ठ पत्रकार, खासदार यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेली ही पहिली प्रदीर्घ मुलाखत आहे. खासदार संजय राऊत यांनी गेले काही दिवस केलेल्या ट्वीटमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेप्रमाणे उद्धव यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली.

हेही वाचा:

कुठल्याही सरकारचं नेतृत्व जो व्यक्ती करतो, त्याच्या नावानंच सरकार ओळखलं जातं. केंद्रातील एनडीएचं सरकारही नरेंद्र मोदी यांच्या नावानंच म्हणजे ‘मोदी सरकार’ म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार हे सुरुवातीपासूनच ” म्हणून ओळखलं जात आहे. महाराष्ट्रात ठाकरे या नावाला राजकीय वलय असल्यानं त्याबद्द्ल अधिकच चर्चा होते.

हेही वाचा:

राऊत यांनी उद्धव यांना याच अनुषंगानं प्रश्न विचारला. राज्यातील सरकारला ‘ठाकरे सरकार’ म्हटलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. त्यावरही उद्धव यांनी लगेचच खुलासा केला. ‘नेतृत्व माझं म्हणून तसं बोलणं ठीक आहे. पण हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी महाविकास आघाडीचा प्रयत्न स्वीकारला. त्याचं स्वागत केलं, त्या जनतेचं हे सरकार आहे,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here