नोएडा: महिन्याकाठी लाखभर पगार मिळाल्यावर अनेकांना कौतुक वाटतं. चांगली नोकरी, महिन्याला लाखभर पगार घेणाऱ्यांना सगळ्यांकडून मानसन्मान मिळतो. लाखात पगार घेणारी व्यक्ती कौतुकाचा विषय ठरते. मात्र उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये चक्क पान टपरींसाठी लाखांमध्ये बोली लागत आहे. एकेका टपरीचं महिन्याचं भाडं लाखाच्या घरात आहे. सेक्टर १८ मध्ये तर एका टपरीसाठी तब्बल सव्वा तीन लाखांची बोली लागली.

सव्वा तीन लाख रुपयांमध्ये एखादं कुटुंब परदेशवारी करून येईल. मात्र नोएडाच्या सेक्टर १८ मध्ये साध्या पान टपरीचं मासिक भाडं ३ लाख २५ हजार रुपयांच्या घरात आहे. एखाद्या चांगल्या कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या पगाराइतकी रक्कम नोएडात पान टपरीच्या मालकाला भाड्यापोटी मिळते. कारण नोएडामध्ये पान टपरीच्या व्यवसायातून होणारी कमाई लाखोंच्या घरात जाते.
मुकेश अंबानींच्या दुकानांवर मोठा छापा, देशभरात कारवाई; हजारो खेळणी जप्त, कारण काय?
नोएडा प्राधिकरणानं सेक्टर १८ मधील १० पान टपरींचा लिलाव केला. मंगळवारी ७ टपऱ्यांसाठी बोली लागली. प्राधिकरणानं भाड्याची रक्कम २७ हजार रुपये प्रतिमहिना ठेवली होती. यातील एका टपरीसाठी तर २० जणांनी बोली लावली. ही बोली सोनू कुमार झा यांनी जिंकली. त्यासाठी त्यांनी तब्बल सव्वा तीन लाख रुपयांची घसघशीत बोली लावली.
दीड वर्षांपूर्वी बायको गेली, दुसऱ्या संसारासाठी लगीनघाई; अचानक पोलीस आले, अंगणातूनच ‘वरात’
सोनू कुमार यांना १४ महिन्यांचं भाडं पुढच्या १० दिवसांत द्यावं लागणार आहे. पुढच्या दीड आठवड्यात सोनू यांना ४५ लाख रुपये द्यायचे आहेत. विशेष म्हणजे हे पैसे भरण्याची सोनू यांची तयारी आहे. ज्या पान टपरीसाठी सोनू यांनी तब्बल सव्वा तीन लाख रुपयांची बोली लावली, त्याचं क्षेत्रफळ केवळ ७.५९ चौरस मीटर इतकं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य माणूस ही टपरी भाड्यानं घेण्याचं धाडस करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here