नवी दिल्ली: प्रसिद्ध क्रीडा अँकर एम्मा जोन्स हिच्या सोबत एक भयानक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. संबंधित प्रकाराची माहिती स्वत: एम्माने सोशल मीडियातून सर्वांना सांगितली.

एम्मा जोन्सचा फोटो एका अज्ञात व्यक्तीने एक्स रेटेड डेटिंग साइटवर पोस्ट केला. या गोष्टीची एम्माला जराही कल्पना नव्हती. संबंधिक पोस्टची माहिती तिला सोशल मीडियावरन एका युझरने दिली. एम्माला त्या युझरने डेटिंग साइटचा प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर करून ही धक्कादायक प्रकार सांगितला.

वाचा- रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक; वर्ल्डकपच्या आधी सापडला विजयाचा X फॅक्टर


संबंधित स्क्रीनशॉट पाहून एम्माला धक्का बसला आणि राग देखील आला. अशा प्रकारच्या साइटवर स्वत:चा फोटो पाहून एम्माने थेट सोशल मीडियाची मदत घेण्याचे ठरवले. एम्माने याबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, या साइटवर माझा फोटो आहे . हा काय प्रकार आहे. मला याबद्दल सर्च देखील करण्याची इच्छा नाही.

वाचा- शरद पवार परिस, त्यांनी सांगितले तर कोरड्या विहिरीत उडी मारेन, पाहा असं म्हणाल तरी कोण?

वाचा- टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा


एम्मा ही युकेमधील एक क्रीडा अँकर आहे. सोशल मीडियावर एम्मा फार लोकप्रिय असून इंस्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओमुळे ती नेहमी चर्चेत देखील असते.

23 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here