pune news today in marathi, एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते, आता बिघडलेत; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा – ajit pawar criticized the chief minister eknath shinde pune news
शिरूर ( पुणे) : आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता तिकडे गेल्यावर मात्र जरा बिघडलेत, बिघडलेत म्हणजे…आता हेडलाईन्स होणार असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव महागणपती गावच्या ग्रामसचिवालय लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी अजित पवार यांनी राजकीय फ्टकेबाजी केली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आमचं सरकार असताना एसटी आंदोलनातही शहाणी काही आमदार तिथं जाऊन झोपली होती. एक तर म्हणायचा डंके की चोट पे करूंगा. डंके की चोट पे करुंगा, आता डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली. आता एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जबाबदार कोण, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. सरकार आमचं असलं की रात्रंदिवस तुम्ही तिथं आंदोलन करणार, अशा शब्दात अजित पवार यांनी पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली आहे. बीडीडी पुनर्विकासाच्या नावावरुन राजकारण तापले; आधीच्या नामकरणाला भाजपचा विरोध यावेळी एसटी बंद होती, तर पगाराला अडीच कोटी रुपये आम्ही देत होतो. तर उपकार केले नाही. कारण त्यांची पण कच्ची- बच्ची घरात आहेत. कशी ही माणसं बदलतात बघा. सरडा कसा रंग बदलतो. आता सरकार बदललं आता हे लोक बोलायला तयार. मूग गिळून गप्प बसलेत, असेही अजित पवार म्हणालेत.
मी पालकमंत्री असताना अनेक कार्यक्रम करायचो आताच्या पालकमंत्र्यांनी पत्रकच काढलं आहे, कोणताही कार्यक्रम करण्या अगोदर आमची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे पत्रकच काढले आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच राज्यात कुणालाही कुठंही फिरायचा अधिकार आहे. कायदाचा आदर केला गेला पाहिजे, संविधानाचा आदर झाला पाहिजे, हातात कायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, राज्यात कायदा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, अशी तंबीच अजित पवार यांनी दिली.
कोयता गँगबाबत…
कोणीही उठतं आणि कसलीही गँग करते. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं पोलिसांचं काम आहे. कोणीही कितीही मोठ्या बापाचा असेल कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई झालीच पाहिजे. मग, सत्ताधारी पक्षाचा असो की, विरोधी पक्षाचा महाराष्ट्र व्यवस्थित चालू शकेल, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांना सुनावले.