Maharashtra Politics | काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. सत्यजीत तांबे यांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी भाजप, मनसे, शिंदे गट अशा सर्वच पक्षांची मदत मागितली आहे. त्यामुळे आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का, हे पाहावे लागेल. या सगळ्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे.

 

Ajit Pawar and Balasaheb Thorat
अजित पवार आणि बाळासाहेब थोरात

हायलाइट्स:

  • मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं होतं, काळजी घ्या
  • सत्यजीत तांबेंच्या प्लॅनचा अजित पवारांना सुगावा लागला होता
  • बाळासाहेब थोरात आता काय बोलणार?
पुणे: काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे नाशिकमध्ये संघटनेची ताकद असूनही रिंगणात काँग्रेसचा उमदेवार नसल्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते तांबे पितापुत्रांच्या नावाने खडे फोडत आहेत. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचे मामा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनाही या सगळ्याची कल्पना कशी नव्हती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सत्यजीत तांबे ऐनवेळी वेगळा डाव टाकणार, याची कल्पना मी बाळासाहेब थोरात यांना दिली होती. मात्र, थोरातांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा सूर अजित पवार यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘दोन-तीन दिवस कानावर वेगळं येत होतं. तेव्हा मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो . त्यांना सांगितलं की, असं काहीतरी कानावर येतंय, तुम्ही काळजी घ्या.तुम्ही बघा काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे, हे मी बाळासाहेब थोरातांना सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी भरायच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे, आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबे यांचाच फॉर्म येईल,असे बाळासाहेब थोरातांनी म्हटल्याचे मला चांगले आठवते’, असे अजित पवार सांगितले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता बाळासाहेब थोरात हे काय स्पष्टीकरण देतात, ते पाहावे लागेल. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला दिलेल्या धक्क्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सत्यजीत तांबेंनी मोदींच्या फोटोला काळे फासतानाचे जुने फोटो व्हायरल; काय आहे नेमके प्रकरण?

नाशिकमध्ये काँग्रेसचा मोठा निर्णय, सत्यजीत तांबे नव्हे तर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी पक्षाचा एबी फॉर्म दिला असतानाही उमेदवारी अर्ज दाखल न करणारे आणि अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या तांबे पितापुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पक्षाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले. आम्ही या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्याऐवजी नाशिकमधील अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर सत्यजीत तांबे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सत्यजीतसाठी पक्ष तयार होता? कोरा एबी फॉर्म दिल्याची चव्हाणांची माहिती

‘सामना’तून महाविकास आघाडीला कानपिचक्या

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले. पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीकडे आणि दोन जागा भाजपकडे होत्या. महाविकास आघाडीने समन्वय आणि नियोजन या सूत्राने काम केले असते तर यावेळी तीन जागा कायम राखून एक जास्त जागा जिंकता आली असती. पण आता हे सुद्धा गमावण्याची वेळ आली आहे. या गोंधळास जबाबदार व्यक्ती कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भाजपला मोकळे रान द्यायचे, असे महाविकास आघाडीतील लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here