Weather Update News : राज्यात थंडीचा कडाका (Cold Weather) कायम हे. अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे. मुंबईत (Mumbai) थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडी वाढली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात तापमानात चांगलीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 8 अंशाच्या खाली गेला आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्याचबरोबर राठवाडा देखील गारठला आहे. तिथेही तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे.

कोकणातही तापमानात घट 

कोकणातही थंडाचा जोर वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं जोराची थंडी पडली आहे. रत्नागिरी  जिल्ह्यात थंडी वाढली आहे. ग्रामीण भागात तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत खाली घसरला आहे.

पाहुयात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

सोलापूर -14.3
सातारा – 11 
नाशिक – 8.8
कोल्हापूर – 15
नांदेड – 15
औरंगाबाद – 8.8
जळगाव – 8
रत्नागिरी -17.5 
सांताक्रुज – 15.2 
कुलाबा – 17.4
उदगीर – 15
पुणे – 9.9
महाबळेश्वर – 12.5
डहाणू – 14.2
परभणी – 13.4
नागपूर – 14.2
जालना – 15.3
माथेरान – 11.6
बारामती – 10.7
उस्मानाबाद – 10.5
मालेगाव – 12.8
यवतमाळ – 12
अमरावती – 12.3

news reels

सध्या उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. तिथे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. जळगावमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमध्येही 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळं चांगलीच थंडी वाढली आहे. मराठवाड्यातही पारा घसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर कायम, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

49 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here