येथील जिल्हा कारागृहातून तीन आरोपी पळाल्याची घटना आज शनिवारी सकाळी साडेसात वाजता घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तीन संशयितांमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा देखील समावेश आहे.

सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील (रा. तांबापुरा, अमळनेर) आणि सागर संजय पाटील (रा. पैलाड, अमळनेर) अशी कारागृहातून पळालेल्या आरोपींची नावे आहेत. कारागृहात दररोज सकाळी कामांसाठी ज्याप्रमाणे आरोपींना सोडले जाते. तसेच शनिवारी देखील आरोपींना सोडण्यात आले होते. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून हे तिघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, कारागृहात आत आणि बाहेर अशी दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना आरोपी पळाले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज दुपारी कारागृहास भेट देणार आहेत.

बडतर्फ पोलिसाचा समावेश

सुशील मगरे हा काही दिवसांपूर्वीच पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती. त्यानंतर तो येथील जिल्हा कारागृहात होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here