Pune News G-20 : पुण्यातील रस्त्यांवर थुंकणं काही (Pune) जणांना महागात पडलं आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाच पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी सफाई करायला लावत अद्दल घडवली. तर 3 दिवसात तब्बल 1 लाख 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जी -20 (puneG-20) च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सगळीकडे स्वच्छता केली जात आहे. अनेक परिसात मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर थुंकणाऱ्यांवर आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. 

थुंकणाऱ्यांवर विशेष कारवाई

रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाच पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी सफाई करायला लावत अद्दल घडवली. त्याला भररस्त्यात थुंकलेली घाण साफ करायला लावली. याचा व्हिडीओ पालिकेने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर पुणे पोलिसांनी कमेंट्सदेखील केल्या आहेत. पुण्यात जी-20 च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि शहरात सुशोभिकरणाचं काम सुरु आहे. विमानतळ ते सेनापती बापट रोड दरम्यान असलेला परिसर चकाचक करण्यात आला आहे. चौकात मोठे मोठे स्कल्पचर उभारले आहेत. स्वच्छता सुरु असतानाच दुसरीकडे वेजबाबदार पुणेकर रस्त्यांवर थुंकताना आणि घाण करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना पालिकेने चांगलीच अद्दल घडवण्याचं ठरवलं आहे. 

गेल्या दहा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 23 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 23 हजारांचा दंड वसूल केला आहे.सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या 422 जणांकडून 1 लाख 46 हजार 420 रुपयांचा दंड वसूल केला आहे.सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांकडून 2 हजार 600 रुपये वसूल केला आहे.  17 ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांकडून 9 हजार 500, वर्गीकरण न करता कचरा दिल्याबद्दल 30 जणांकडून 3 हजार 760  रुपये दंड वसूल केला आहे. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या दहा जणांवर कारवाई करून 38 हजार, प्लास्टिक कारवाई सात ठिकाणी करून 35 हजाराचा दंड वसूल केला आहे.

G-20 परिषदेसाठी पुणे सज्ज

पुण्यात जी-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरात वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी सुरु आहे. वेळेत कामं पूर्ण करण्यासाठी काही मार्गावर सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते आणि पादचारी रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे. त्यासोबतच रस्त्यांवरील दिव्यांची पाहणी केली जात आहे. काही अंतराच्या कामासाठी नोडल अधिकारी नेमला आहे. त्यासोबतच यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. 

 

संबंधित बातमी-

Pune G-20 : जी-20 च्या परिषदेसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करा; महापालिका आयुक्तांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here