Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड याने 6-4 अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढतीत धडक मारली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होईल. 

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. काही वेळातच आता अंतिम लढत देखील होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या अंतिम लढतीकडं लक्ष लागून राहिलं आहे.  

गादी विभागातील अंतिम लढतीत शिवराजने पहिल्यापासून आघाडी घेत शेवटपर्यंत कायम ठेवली. सहा गुण मिळवलेल्या शिवराजने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. पहिल्या फेरीत हर्षवर्धन सदगीर याला एकही गुण मिळवता आला नाही. शिवराज याने ही लढत 6-1 अशा फरकाने जिंकली आणि अंतिम लढतीत धडक मारली.    

news reels

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here