शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावरून आपणं करोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिलंय ‘प्रिय देशवासियांनो, मला कोविड १९ ची काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे करण्यात आलेल्या टेस्टनंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या निकटचा संपर्क असणाऱ्या लोकांनी स्वत:ला क्वारंटीन करावं’.
वाचा :
वाचा :
‘मी करोना गाईडलाईन्सचं संपूर्ण पालन करतोय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला क्वारंटीन करून उपचार घेणार आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकही करोनाला आमंत्रण देऊ शकते’ असंही शिवराज सिंह यांनी म्हटलंय.
आपण २५ मार्चपासून प्रत्येक सायंकाळी करोना संक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेतच राहू तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करोना समिक्षेचा प्रयत्न करेन, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हणत जनतेला आश्वासित केलंय.
वाचा :
मध्य प्रदेशातल्या करोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेतली तर आत्तापर्यंत राज्यात २६ हजार २१० रुग्ण आढळलेत. यातील ७५५३ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर अद्याप १७ हजार ८६६ जणांवर उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशात एकूण ७९१ जणांनी करोनामुळे प्राण गमावलेत.
देशातील स्थिती लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी देशातील करोना संक्रमितांची संख्या वाढून १३ लाख ३६ हजार ८६१ वर पोहचलीय. यातील एकूण ४ लाख ५६ हजार ०७१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात ८ लाख ४९ हजार ४३२ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. मृतांची संख्या वाढून ३१ हजार ३५८ वर पहोचलीय.
शुक्रवारी एकाच दिवशी देशात करोनाचे ४८ हजार ९१६ नवीन रुग्ण आढळले आहेत तर एकाच दिवशी ७५७ करोनाबाधितांचा मृत्यू झालाय. समाधानाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तब्बल ३२,२२३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times