रांची: झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सोनुआ येथील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. लोंजो गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडल्यानंतर पतीनं प्रियकराला निर्घृणपणे संपवलं. पतीनं प्रियकराचं शिर धडावेगळं केलं. विश्वनाथ सुंदी असं आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पत्नीचे श्यामलाल हेमब्राम नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय विश्वनाथला होता. श्यामलाल जवळच असलेल्या सेगायसाई गावात वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री विश्वनाथचा संशय खरा ठरला. त्यानं पत्नीला श्यामलालसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यामुळे विश्वनाथचा पारा चढला. त्यानं श्यामलाल खेचत झाडाला बांधलं. त्यानंतर कुऱ्हाडीनं त्याचं शिर धडावेगळं केलं. श्यामलालचा जागीच मृत्यू झाला.
भीषण! बाईकची कारला मागून जोरदार धडक; बाईकस्वार हवेत उडाला; विंडशील्ड फोडून आत घुसला
सोनुआ पोलिसांनी आरोपी विश्वनाथ सुंदीला शनिवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी श्यामलालचा मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ताब्यात घेतली. पोलिसांनी मृतदेह ऑटोप्सीसाठी पाठवला. या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या निर्घृण हत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here