चालत्या कारमध्ये मित्राच्या पत्नीच्या अंगाला स्पर्श करत ढुमे यांनी लगट केली. जेव्हा नारळीबाग येथील मित्राच्या घरी आले, तेव्हा वॉशरूम वापरण्याचे कारण सांगत ढुमे बेडरूममध्ये पोहोचले. तिथेही त्यांनी महिलेसोबत लगट केली. यानंतर महिलेच्या पतीसोबत वाद घालून हाणामारी केली.या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री धिंगाणा केल्याचा रहिवाशांचा आरोप
एसीपी ढुमे यांनी रात्री परिसरात सुमारे तास ते दीड तास गोंधळ घातला. बरीच विनंती करूनही त्यांनी ऐकले नाही. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी कुणाल खरात यांनी दिली. शेवटी ११२ क्रमांकावर कॉल करून पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली आणि ढुमे यांना सोबत नेले. ढुमे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी रहिवाशांची मागणी असल्याचे खरात यांनी सांगितले.
Home Maharashtra case against acp, वॉशरुमच्या बहाण्यानं बेडरुममध्ये पोहोचले, मित्राच्या बायकोशी लगट; एसीपींविरोधात गुन्हा...