Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलीस (Aurangabad City Police) दलात सहायक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of Police) असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून, आता ढुमे यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. हॉटेलमध्ये भेटलेल्या एका मित्राला घरी सोडण्याची विनंती केली आणि गाडीत बसल्यावर त्याच मित्राच्या पत्नीची छेडछाड केली. तसेच त्यांच्या घरासमोर गोंधळ घालून मारहाण केल्याचा आरोप ढुमे यांच्यावर करण्यात आला आहे. सोबतच ढुमे यांच्याकडून राडा घालतानाचा आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

पीडीत 30 वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी 14 जानेवारी रोजी रात्री 10. 38 वाजता त्या आपल्या पती आणि लहान मुलीसह शहरातील सिडको येथील रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी ते फॅमीली शेक्शनच्या ठिकाणी जेवणासाठी बसले होते. याचवेळी समोरचं असलेल्या वैयक्तिक सेक्शनमध्ये विशाल ढुमे बसलेले होते. त्यामुळे जेवण झाल्यावर ओळखीचे असल्याने महिलेच्या पतीने ढुमे यांच्याकडून त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर महिलेचा पती आणि विशाल ढुमेसह अन्य दोन व्यक्ति फॅमिली सेक्शन आले. 

घरी सोडण्याची विनंती… 

दरम्यान याचवेळी विशाल ढुमे यांनी, मी मिल कॉर्नर येथील पोलीस मुख्यालय येथे राहत असुन, तिथपर्यंत सोडण्याची विनंती केली. विनंती केल्याने महिलेच्या पतीने देखील होकार दिला. त्यानंतर महिलेचा पती, मुलगी आणि विशाल ढुमे एकाच गाडीने हॉटेलमधून निघाले. गाडीत बसल्यावर महिलेचे पती गाडी चालवत होते, तर महिला पुढच्या सीटवर त्यांच्या बाजूला बसलेले होते. दरम्यान याचवेळी मागे बसलेल्या विशाल ढुमे याने महिलेची छेडछाड काढायला सुरवात केली. तसेच महिलेच्या अंगावर हात फिरवला. यावेळी महिलेने त्यांना मागे लोटायचा प्रयत्न केला. 

news reels

वॉशरुममध्ये जाण्याची मागणी 

दरम्यान पीडीत महिलेचा घर आल्याने महिला आपल्याल बाळाला घेऊन गाडीतून उतरली आणि आपल्या घरातील पहीला मजल्यावर गेली. घरात गेल्यावर महिला गॅलरीमध्ये येऊन आपल्या पतीला पाहण्यासाठी गेली असता, ढुमे खाली गोंधळ घालत होते. महिलेचे पती त्यांना हात जोडून तुम्हाला घरी सोडतो म्हणून, विनंती करत होते. पण ढुमे आयकत नव्हते. तसेच पीडीत महिलेच्या पतीच्या बेडरूममधील वॉशरुममध्ये जाण्याची मागणी करत होते. त्यांच्या गोंधळाने आजूबाजूला असलेले लोकं जमा झाली. सर्व मिळून ढुमे यांना समजून सांगत होते, पण ते अंगावर धावून जात होते. त्यामुळे महिलेच्या पतीने 112 वर फोनकरून याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर 112 चे कर्मचारी विशाल ढुमे यांना घेवुन गेले. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात ढुमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here