बेनोनी: भारतीय महिला क्रिकेट संघाने अंडर-19 टी-२० विश्वचषक स्पर्धेची दणदणीत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात सलामीवीर श्वेता सेहरावतच्या नाबाद ९२ धावा आणि कर्णधार शेफाली वर्माच्या १६ चेंडूत ४५ धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतासाठी शेफाली आणि सेहरावत यांनी सात षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. भारतासाठी ५१ टी-२०, दोन कसोटी आणि २१ एकदिवसीय सामने खेळलेली शेफाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. आपल्या खेळीत तिने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. ती आठव्या षटकात फिरकी गोलंदाज मियाने स्मितच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्याचवेळी सेहरावतने ५७ चेंडूंच्या खेळीत २० चौकार लगावले आणि तिने २१ चेंडू राखून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.शेफालीने गोलंदाजीतही कमाल करत ३ बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन लॉरेन्सने ४४ चेंडूत ६१ आणि एलँड्री जॅन्से व्हॅन रेन्सबर्गने १३ चेंडूत २३ धावा केल्या. डावखुरी फिरकीपटू सोनम यादवने रेन्सबर्गला रिचा घोषकडे झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.यानंतर शेफालीने ओलुहले सियोलाला पॅव्हेलियनमध्ये धाडले. १७व्या षटकात लॉरेन्स धावबाद झाल्यानंतर यजमानांच्या धावांची गती कमी झाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावाच करू शकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here