नवी दिल्लीः श्रमीक स्पेशल ट्रेनवरून कॉंग्रस नेते यांनी केलेल्या आरोपला रेल्वे मंत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचं काय झालं? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत, असं उत्तर
पियुष गोयल यांनी एका ट्विटमधून दिलं आहे. आपत्तीच्या स्थितीतही केंद्रातील मोदी सरकारने श्रमीक स्पेशल ट्रेनद्वारे नफेखोरी केली, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी ट्विट करून केला होता.

राहुल गांधींनी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात एक ट्विट केले होते. ज्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. रोगराईचे ढग दाटलेत, नागरिक संकटात आहेत. तर कामवण्याची हीच संधी आहे. याचा फायदा उचलून गरीबविरोधी सरकारने नफेखोरीचे केली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला. राहुल गांधी यांनी श्रमिक ट्रेन संदर्भातील एका बातमीला टॅग करत हे ट्विट केले. या रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी राहुल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधींनी यांनी शनिवारी एक बातमी ट्विट सरकार आपत्तीतही नफेखोरी करत सल्याची टीका केली. कोरोना साथीच्या काळात भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वार ४२८ कोटी रुपये कमावले. लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरी मजुरांसाठी चालवलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनच्या तिकीटाबाबत राहुल गांधींनी भाष्य केले आहे. स्थलांतरीत मजुरांकडून सरकार रेल्वे तिकीटाचे पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यावेळी विरोधकांनी सरकारला घेरले होते. केंद्र सरकार मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा ८५ टक्के खर्च करत आहे, असं उत्तर सरकारने विरोधकांना दिलं होतं.

कोरोना संसर्गामुळे २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथील लाखो कामगार दिल्ली, मुंबई, पुणे, सूरत, अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये अडकून पडले होते. रेल्वे वाहतूक बंद झाल्याने त्यांना आपल्या गावी परतता येत नव्हतं. यामुळे अनेक ठिकाणी या स्थलांतरीत मजुरांनी आंदोलनं केली. हजारो मजूनर आपल्या गावी पायीच निघाले होते. या पार्श्वभूमीर रेल्वे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू केल्या. ज्या शहरांमध्ये स्थलांतरी मजूर अडकले आहेत, तिथून या श्रमिक स्पेशल स्ट्रेन सोडल्या गेल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here