दोन डॉक्टरांमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. मुंबईच्या कूपर रुग्णालयातील हे दोन वरिष्ठ डॉक्टर असल्याचा दावा नीतेश यांनी ट्वीटमधून केला आहे. व्हिडिओमध्ये एक डॉक्टर खळबळजनक गौप्यस्फोट करताना दिसतोय. ‘करोना हा मोठा धंदा झाला आहे. त्यातून अनेकांना मोठी मलई मिळत आहे. क्वारंटाइन सेंटर वगैरेच्या नावानं २५-२५ आणि ५०-५० कोटी दिले जाताहेत. महापालिकेचा सगळा पैसा संपवून टाकला आहे. करोनाचा बिझनेसच सुरू केला आहे. आमचे डीन आणि आम्ही कोविड सेंटरमध्ये जातो, तेव्हा बघून लक्षात येतं की हा धंदा सुरू आहे. त्यांना हा करोना संपवायचा नाही कारण हा धंदा बंद होईल. आपल्या सरकारनं आता हा धंदाच सुरू केला आहे,’ असं हा डॉक्टर म्हणतो.
‘ह्यांना अर्थव्यवस्थेशी काही देणंघेणं नाही. त्यांची इकॉनॉमी सुधारते तेवढंच त्यांना हवं आहे. हे राजकारणी करोनातूनही पैसे कमवताहेत. लोकांच्या जिवाची ह्यांना काहीही पडलेली नाही,’ असा संतापही हा डॉक्टर व्यक्त करताना दिसतो.
या व्हिडिओचा हवाला देऊन नीतेश यांनी राज्य सरकारवर कोविड घोटाळ्याचा आरोप केला आहे. ‘आम्ही पुन्हा पुन्हा जे सांगत होतो, तेच हे डॉक्टर सांगत आहेत. महाराष्ट्र सरकारनं करोनाचा धंदा केला असून त्यातून प्रचंड पैसा कमावला जात आहे,’ असा आरोप नीतेश यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times