Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर एकामागोमाग एक राजकीय घडामोड घडत आहेत. यातला एक एक ट्विस्ट सत्यजित तांबे यांच्या विरोधात जात आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक सत्यजित तांबे यांच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून नवा प्रश्न उपस्थित केला आहे. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. नंदुरबार येथील अविनाश माळी (Avinash Mali) यांनी आता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्यावर सणसणीत आरोप केला आहे. ज्या व्यक्तीने पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रतिमेला काळे फासले होते. त्याला भाजपा पाठिंबा देत असेल तर भाजप विचारसरणीचे आमच्यासारखे मतदार का मतदान करतील? आपणही निवडणूक घराणेशाहीच्या विरोधात लढत असून या मतदारसंघात आमदार राहिलेल्या आमदारांनी पदवीधरांच्या आणि शिक्षकांच्या कुठल्याही प्रश्नांकडे लक्ष न दिल्याने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या श्रेष्ठींना आणि राज्यातील नेत्यांनी यांना पाठिंबा देण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करावा, असे आवाहन अविनाश माळी यांनी केले. 

दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून पाहायला मिळत असून कालच अपक्ष उमेदवार तसेच धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर या निवडणुकीत समीकरण बदलले आहे. तर तत्पूर्वी काँग्रेसचे नेते पिता पुत्रांच्या खेळीमुळे या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला. दरम्यान आता सत्यजित तांबे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून धनराज विसपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. तर आता नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अविनाश माळी यांनी देखील सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा मुद्द्यावरून भूमिका मांडली आहे. सध्या सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा मुद्द्यावरून अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये वेगवेगळे मत प्रवाहासमोर येत असल्याचे चित्र यावरून दिसून येत आहे.

अविनाश माळी हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे शिक्षण हे बीए झाले आहे. अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांच्या आहे, नगरसेविका आहेत. त्याचबरोबर अविनाथ माळी हे भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत. अनेक हिंदुत्वादी संघटनांना ते मदत करत असल्याचे जाहीरनाम्यातून सांगितले आहे. अविनाश माळी हे स्वामी समर्थ केंद्राचे निष्ठावान सेवेकरी म्हणून ओळखले जातात. दरम्यान त्यांनी यंदाच्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवीत आहेत. दरम्यान अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून सध्या घमासान सुरु असून त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेते याला पुष्टी देत नाही. मात्र उमेदवार अविनाश माळी यांच्यामते समजा जर भाजपने सत्यजित तांबे यांना पाठींबा दिला तर भाजप विचारसरणीचे लोक मतदान करतील का? असा सवाल उपस्थित केला आहे. 

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here