Dr. Sudhir Tambe from Congress party nashik graduate constituency News:  नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत. 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची  अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here