Makar Sankranti 2023: आज राज्यभरात मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह आहे. वर्षातील पहिलात सण असल्यानं आनंदाचं वातावरण आहे.  देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी झाली. पण जळगाव आणि नागपूरमध्ये दोन कुटुंबावर दु:खाची संक्रात आली आहे. पंतगाच्या नादात जळगाव आणि नागपूरमध्ये दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

जळगावमध्ये विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू – 

पतंग उडवताना तोल जावून विहिरीत पडल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील हिंगोने गावात घडल्याने खळबळ उडाली. 
जळगावात संक्रांत सणाला गालबोट लागले असून धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. अक्षय संजय महाजन (रा. कळमसरे ता. अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव)  असे मयत बालकाचे नाव असून सदर घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.

मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले संजय महाजन (माळी ) हे कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी ) हा बालक रविवारी दुपारी दोन वाजता पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. .  अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.

news reels

नागपूरमध्ये मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू

उपराजधानी नागपूरमध्ये नायलॉन मांजाने गळा कापल्यामुळे 11 वर्षीय वेद साहू या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवर परत जाताना घडली होती घटना… त्यानंतर त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते…गळ्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे आज सकाळी जखमी वेद याचा मृत्यू झाला आहे. वेद याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसशला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेच्या धडकेत 13 वर्षीय ध्रुव धुर्वे या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

आणखी वाचा:
Nagpur : नागपुरात पतंगाच्या मागे धावताना बालकाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here