16 January Headlines : विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे.. याबरोबरच कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स आलं आहे. त्यामुळे चहल  आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज ठाकरे गटाचा ‘रूमणे मोर्चा’ निघणार आहे.  

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस 
 
विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नागपूरची जागा काँग्रेसला दिली जाण्याची शक्यता आहे.  

 
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आज ईडी समोर हजर राहणार

कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीचं समन्स आलं आहे. चहल यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचं आहे.

news reels

अकोल्यात ठाकरे गटाचा मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज ठाकरे गटाचा ‘रूमणे मोर्चा’ निघणार आहे. पुर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भावर होत असलेला अन्याय, पिकविमा कंपन्यांची दादागिरी हे मुद्दे मोर्चातून सरकारच्या लक्षात आणून देण्यात येणार आहेत. खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुखांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.  
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बिऱ्हाड आंदोलन  

 नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेकडून गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जातय.  त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे.  यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केलं जाणार आहे.
 

सोलापूरच्या  सिद्धेश्वर यात्रेत शोभेचे दारू काम सोहळा

 सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत आज शोभेचे दारू काम सोहळा पार पडणार आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदा शोभेचे दारू काम पार पडणार असल्याने मोठा उत्साह असणार आहे. कोरोना काळात केवळ धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शोभेचे दारू काम सोहळा झालेला नव्हता. हा सोहळा संध्याकाळी पार पडेल.  

 
रिमोट वोटर मशीनचा डेमो  

बाहेरगावच्या मतदारांसाठी रिमोट वोटर मशीन आज राजकीय पक्षांना डेमो दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाला अनेक राजकीय पक्षांचा विरोध केलाय.  या डेमोसाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा 57 पक्षांना आमंत्रित केलं आहे.  

प्रभाग रचनेच्या याचिकेवर सुनावणी  

महाविकास आघाडी सरकारनं आपल्या काळात घेतलेला वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत येताच रद्दबातल केला. याविरोधात माजी नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. महापालिका प्रभागांची संख्या 227 वरुन 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. या निर्णयावर शासकीय अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं हा निर्णय बदलला आणि  पुन्हा महापालिकेची प्रभाग संख्या 227 ठेवण्याचा निर्णय जारी करत तसा कायदाच केला. ज्याला राजू पेडणेकर यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होईल. 

जोशीमठ संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी

जोशीमठ संदर्भात दाखल याचिकेवर न्यायमुर्ती चंद्रचूड, न्यायमुर्ती पी एस नरसिंह आणि न्यायामुर्ती जे बी पारदीवाला यांच्या खंडपीठ पुढे सुनावणी होणार आहे. 

पुण्यात राष्ट्रवादीची पत्रकार परिषद 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या  कोल्हापूर दौऱ्यावर

 भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. 
  
अर्बन नक्षल प्रकरणाती आरोपी वरावरा राव यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

अर्बन नक्षल प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याच्या परवानगी करिता वरावरा राव यांनी दाखल केला आहे अर्ज. सदर अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी.

 सीरम इन्स्टिट्यूट विरोधात दाखल मानहानीच्या याचिकेवर सुनावणी

 सीरम इन्स्टिट्यूट विरोधात दाखल मानहानीच्या याचिकेवर आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालय सुनावणी. सामाजिक कार्यकर्ता अंबर कोरई आणि इतरांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here