Thirty Thirty Scam: गेल्या वर्षे राज्यभरात गाजलेल्या मराठवाड्यातील ‘तीस-तीस’ घोटाळ्यात (Thirty Thirty Scam) आता थेट ‘इडी’ची एंट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. कारण या घोटाळ्याची माहिती ‘ईडी’च्या पथकाने मागवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेल्या संतोष राठोडकडे सापडलेल्या डायरीत काही राजकीय नेत्यांची नावं होती. ज्यात एका मोठ्या नेत्याचा देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) शेतकऱ्यांची फसवणूक करणारा तीस-तीस घोटाळा समोर आला होता. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसांत मुख्य आरोपी संतोष राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे या गुन्हाची व्याप्ती वाढल्याने गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपास करतांना पोलिसांना यात आरोपीकडे तीन वेगवेगळ्या डायऱ्या सापडल्या होत्या. ज्यात हा घोटाळा साडेतीनशे कोटीपेक्षा अधिकचा समोर आले होते. तर याचवेळी डायरीत अनेक राजकीय नेत्यांचे नाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. तर यातील मुख्य आरोपी संतोष राठोड अजूनही हर्सूल कारागृहात असून, त्याला जामीन मिळालेला नाही. 

तीस-तीस घोटाळ्यात ‘ईडी’ची एंट्री…

दरम्यान आता या तीस-तीस घोटाळ्यात ‘ईडी’ची एंट्री झाली आहे. कारण या सर्व प्रकरणाची माहिती ‘ईडी’ने मागवली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘ईडी’च्या पथकाने ही माहिती मागवली आहे. त्यामुळे आगामी काळात तीस-तीस घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यात अनेक राजकीय नेत्यांची देखील चौकशी होऊ शकते. सोबतच यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील नावं असल्याचे बोलले जात आहे. 

news reels

शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक…

औरंगाबादच्या तीस-तीस घोटाळ्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची  फसवणूक झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या ‘डीएमआयसी’साठी हजारो शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. तर याचा मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांना मोबदला मिळाला होता. हीच गोष्ट लक्षात घेत आरोपी संतोष राठोड याने परिसरातील शेतकऱ्यांना अधिकच मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे जमा केले. यासाठी त्याने काही विशेष एजंट देखील नेमेले होते. पाहता-पाहता यात बिडकीन परिसरातील गावाची गाव या घोटाळ्यात अडकली. मात्र पैसे घेऊन राठोडने परतावा देणं बंद केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

संबंधित बातमी :

Aurangabad Scam : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा; हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here