Aurangabad News: वाहनचोरीच्या घटना औरंगाबादचं नाही तर राज्यात सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे वाहनचोर शहर पोलिसांसाठी (Police) डोकेदुखी ठरत आहेत. औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत 2022 या वर्षात चोरट्यांनी 925 वाहने पळवली. त्यामधील अवघी 293  वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पण चोरीला गेलेलं वाहन तुम्ही अवघ्या 400 रुपये खर्च केल्यास परत मिळवू शकतात. यासाठी औरंगाबाद शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी भन्नाट सल्ला दिला आहे. 

अनकेदा चोरटे शहरातील मुख्य बाजारपेठांच्या ठिकाणाहून वाहन चोरी करतात. मात्र एकदा दुचाकी चोरीला गेल्यास तिला शोधण्यासाठी पोलिसांना मोठ्याप्रमाणात परिश्रम घ्यावे लागते. विशेष म्हणजे अनेकदा बाहेर जिल्ह्यातील चोरटे शहरात येऊन चोरी करुन गेल्याने त्यांना शोधणे देखील सोपं नसते. त्यामुळे अशावेळी पोलिसांनी वाहनचालकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. 

पोलिसांचा सल्ला! 

दुचाकी मालकांनी चोरीपासून बचाव करण्यासाठी नियमित हॅण्डल लॉकशिवाय 100 रुपयांचे एक्स्ट्रा लॉक आणि 300 रुपयांचे जीपीएस ट्रॅकर बसवल्यास चोरीला गेलेली दुचाकी शोधणे पोलिसांना सहज शक्य होते. त्यामुळे केवळ 400 रुपयांत दुचाकीचोर सापडू शकतात. ही काळजी दुचाकी मालकांनी घेतली पाहिजे, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव म्हणाले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अशी काळजी घेतल्यास याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

पोलिसांकडून विशेष पथकाची नियुक्ती! 

औरंगाबाद शहर पोलीस दलाचे आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक ठाण्यात एक पथक तयार केले आहे. ज्या भागातून नियमित वाहने चोरीला जातात, त्या भागात हे पथक सापळा लावून थांबलेले असते. विशेष म्हणजे, साध्या गणवेशात पोलीस नजर ठेवून असतात. याशिवाय गुन्हे शाखेची पथकेही वाहनचोरांवर नजर ठेवून असतात. त्यामुळे अनेकदा वाहनचोर पोलिसांच्या हाती लागतात. पण असे असलं तरीही चोरी गेलेल्या अनेक वाहन सापडत नाही हे देखील समोर आले आहेत. 

news reels

रविवार चोरीचा दिवस

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना रविवारी उघडकीस आल्या आहेत. 2022 या वर्षभरात रविवारी 135 दुचाकी चोरीला गेल्या. सोमवार 132, मंगळवार 113, बुधवार 116, गुरुवार 119, शुक्रवार 123 आणि शनिवारी 116  दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

मोठी बातमी! राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची ‘ईडी’ने मागवली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here