बीड : शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या नर्स महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने सतत दोन वर्ष बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी एका युवकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील एका खाजगी रुग्णालयात मागील काही वर्षांपासून ३० वर्षीय विवाहित महिला नर्स म्हणून काम करत होती. तिच्यासोबत या रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर (वय २३ वर्ष) याची व पीडित महिलेची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. या दरम्यान युवकाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवलं आणि त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

१६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गेला, आता तिचंही प्लेन क्रॅश, को-पायलट अंजूबाबत दुर्दैवी योगायोग

या कालावधीत तरुणाने सतत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र दादासाहेब हा लग्नास टाळाटाळ करू लागला. यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब तौर याच्याविरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपी फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरज कुमार बच्चू हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here