Aurangabad Fire News: औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या एका ‘चटाई कंपनी’ला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मोठ्याप्रमाणावर आग लागल्याने परिसरात सर्वत्र आगीचे लोट पाहायला मिळत आहे. तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे आजूबाजूला आणखी काही कंपन्या असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. 

औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या एका ‘चटाई कंपनी’ला काही वेळापूर्वी आग लागली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी चालू होती. तसेच कंपनीत काही कामगार देखील कामाला होते अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. पण आगीचे प्रमाण अधिक असल्याने आणखी काही अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सविस्तर वृत्त थोड्या वेळात…

 

news reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here