तिरुअनंतपुरम: जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला एकामागून एक झंझावाती शतकं झळकावत आहे. गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून तीन शतके झळकली आहेत. कोहलीच्या आणखी चार शतकांसह सचिन तेंडुलकरचा ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडला जाईल. श्रीलंकेविरुद्ध रनमशिनने ११० चेंडूत नाबाद १६६ धावा केल्या. कोहलीने आपल्या डावात ८ षटकार मारले आणि १३ चौकारही मारले. कोहलीने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नाव केला आहे. या शॉट्सचा वर्षाव होता असताना कोहलीचा एक षटकार हा जणू धोनीच्या षट्कारसारखा लगावला.वाचा: कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या डावात कोहलीने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३१ आणि श्रेयस अय्यरसह (३८) तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. कोहलीच्या खेळीमुळे भारताला शेवटच्या ११ षटकांत १२६ धावा करता आल्या. विराटने या सामन्यात वनडेमधील ४६वे आणि ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. या खेळीदरम्यान विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. सामन्याच्या ४४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ९७ मीटरचा एक दणदणीत षटकार कोहलीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. समोर गोलंदाज कसून रजिथा होता. आता या जबरदस्त हिटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये षटकार मारल्यानंतर कोहली सहकारी फलंदाज श्रेयस अय्यरला म्हणाला, ‘माही शॉट’. या सामन्याबद्दल बोलायचे तर विराट आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे भारताने निर्धारित ५० षटकात ५ गडी गमावून ३९० धावा केल्या.हेही वाचा: वाच: सिराज गोलंदाजीत चमकलामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुणा संघ सिराजच्या गोलंदाजीपुढे पुरता नमला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाहुण्या संघाचा चांगलाच धुव्वा उडवला. गेल्या अनेक सामन्यांपासून सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या सिराजने पुन्हा एकदा पहिल्या पॉवरप्लेमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि पहिल्या पाच षटकांत चार बळी घेतले.दहा षटकांत ३९ धावांत पाच गडी गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ सामन्यातून पूर्णपणे बाद झाला. सिराजशिवाय मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्यामुळे श्रीलंकेचा संघ २२ षटकात ७३ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ३१७ धावांनी हा तिसरा वनडे सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here