Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहायक पोलीस आयुक्त (ACP – Assistant Commissioner of Police) असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडीत महिलेने पोलिसांत तक्रार दिल्याने सिटी चौक पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ढुमे यांच्याकडून जामिनीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aurangabad News : ‘एसीपी’कडूनच महिलेची छेड, दीड तास सुरु होता राडा; पाहा औरंगाबादेत नेमकं काय घडलं