कोल्हापूर: जेवणार नाही असा हट्ट करत असलेल्या सहा वर्षाच्या मुलीला रागावलेल्या वडिलांनी जोरात कानशिलात लगावले. यामुळे तिचे डोके भिंतीवर आपटले. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पण मुलीचा हट्ट तिच्यासह तिच्या वडिलांना मात्र फारच महागात पडला. तिचा तर जीव गेलाच, शिवाय मुलीचा खून केला म्हणून तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. ( )

अनन्या तानाजी मंगे (वय ६ रा. लाड बोळ, जयभवानी गल्ली, ) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. शनिवारी या प्रकरणामागील खरे कारण पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या घटनेप्रकरणी मुलीचे वडील तानाजी दिलीप मंगे (वय २९, रा. , राज्य कनार्टक) याला अटक केली.

वाचा:

कसबा बावडा येथील जयभवानी गल्लीत राहण्यास आलेल्या अनन्या मंगे या सहा वर्षीय मुलीचा शुक्रवारी मृत्यू झाला. मुलगी घरात खेळताना चक्कर येऊन पडून जखमी झाली आणि उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडली असे प्राथमिक कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी ही माहिती घरातील आई वडिलांकडून मिळाली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आल्यावर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तेव्हा खरे कारण उघडकीस आले.

मंगे हा ताराबाई पार्क येथे वॉचमन म्हणून काम करतो. त्याची मुलगी अनन्या ही दोन वर्षापूर्वी खेळताना पडली होती. तेव्हापासून तिला अधून मधून फिट यायच्या. तिचा स्वभाव फार हट्टी होता. दोन दिवस ती जेवण्यास टाळाटाळ करत होती. आग्रह करूनही ती जेवत नसल्याने चिडलेल्या वडिलांनी शुक्रवारी तिच्या कानशिलात लगावली होती. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. पण खेळताना पडून जखमी झाल्याचे सांगून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न झाला होता.

वाचा:

गल्लीत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर शहर पोलिस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सुमिता पाटील, पोलिस कॉन्स्टेबल तानाजी चौगले आणि राजू वरक यांनी तपासाची दिशा वळवली. पोलिसांनी कसबा बावडा जयभवानी गल्लीत चौकशी केली असता मुलगी जखमी झाल्यानंतर परिसरात वादावादी झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अनन्याचे वडील तानाजी यांना ताब्यात घेतले. त्यांनी मुलगी खेळताना पडली, अशी माहिती दिली. पण पोलिसांनी खोलवर चौकशी केल्यावर त्यांनी मुलीला जोरात कानशिलात मारल्यावर तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यामध्ये ती जखमी झाल्याची कबुली दिली. पोलिसांनी वडील तानाजी मंगे यांना अटक केली. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here