Marathwada Teacher Constituency Election: नाशिक आणि नागपुरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच, आता मराठवाडा विभागात देखील अशीच काही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Marathwada Teacher Constituency Election) दाखल करण्यात आलेल्या अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना देखील, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर बंडखोरीचा ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चौथ्यांदा विद्यमान आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा सोळुंके यांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अखेर राष्ट्रवादीत बंडखोरी झालीच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

काय म्हणाले प्रदीप सोळुंके? 

दरम्यान या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देताना प्रदीप सोळुंके म्हणाले की, “माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी तुमचे काम करुन तुम्हाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून तीनवेळा निवडून दिले. पण तुम्ही आमच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही. मग तुम्ही शिक्षकांचे प्रश्न काय सोडवणार. पक्षाने तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीच कशी? हा खरा प्रश्न माझ्यासह इतरांना देखील पडला आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेणार नाही असं प्रदीप सोळुंके म्हणाले. 

संबंधित बातम्या: 

news reels

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here