Nagpur News : देशाचे केंद्रबिंदू असणाऱ्या नागपूरच्या (Nagpur) ऐतिहासिक ‘झिरो माईल’चे सौंदर्य आणखी खुलणार आहे. नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने नागपुरातील महत्वाच्या ऐतिहासिक झिरो माईलच्या सुशोभीकरण संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली आहे.

नागपूर हेरिटेज संवर्धन समितीची बैठक नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या नगररचना विभाग येथे संपन्न झाली. बैठकीत नागपुरातील क्रेडाई संस्थेच्या झिरो माईलच्या संपूर्ण विकास, देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. आता हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला जाईल. येत्या मार्च महिन्यात G20 ची महत्वाची बैठक नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी झिरो माईल स्तंभाचा सुशोभीकरण, संवर्धन आणि जतन करण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

झिरो माईलचा सुशोभीकरण, संवर्धन आणि संरक्षण करण्याचा प्रस्ताव क्रेडाई संस्थेकडून नागपूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावावर हेरिटेज संवर्धन समितीला आपली मान्यता देण्याबाबत सूचित केले होते. झिरो माईल स्तंभलागत सेंड स्टोनचे चार घोडे आणि एक दगडी हेरिटेज स्तंभ असून, चार घोड्यांपैकी दोन घोडे अंशतः क्षतिग्रस्त झाले आहे. क्रेडाई संस्थेने या हेरिटेज स्तंभाचा विकास, सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यांचा प्रस्तावावर हेरिटेज समितीच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. या स्तंभाच्या जवळची जागा सुद्धा विकसित केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाने सुद्धा हेरिटेज वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे निर्देश दिले होते. त्या दृष्टीने सुशोभीकरण झाल्यामुळे नागपूरला वेगळे महत्त्व प्राप्त होईल.

नागपूर हेरिटेज संवर्धन समितीची बैठक अध्यक्ष वास्तुविशारद अशोक मोखा यांचा अध्यक्षेत पार पडली. या बैठकीत प्रमोद गावंडे, उपसंचालक नगररचना आणि सदस्य सचिव, नागपूर हेरिटेज संवर्धन समिती, पी एस पाटणकर, शुभा जोहरी, ए पी मोरे, ए पी बडगे, पंकज पराशर, पराग नगराळे, नंदकिशोर ढेंगळे, क्रेडाई संस्थेचे अभिषेक जव्हेरी, हेमंत नागदिवे, गौरव अग्रवाल, दिनेश भोजवानी उपस्थित होते.

news reels

वॉल पेंटिंग स्पर्धेचे आज पुरस्कार वितरण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेसह (भित्तीचित्र स्पर्धा) स्वच्छ सर्वेक्षणावर आधारीत विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राजे रघुजी भोसले नगरभवन (टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी स्पर्धकांनी वेळेवर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी देखील वाचा…

आपत्तीचा सामना करण्यास ‘आपदा मित्र’; जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here