देशातील निवडलेले सरकार पाडण्यासाठी भाजप घटनात्मक संस्थांचा सतत वापर करीत आहे. याचा निषेध म्हणून, कॉंग्रेस पक्ष उद्या “स्पीक फॉर डेमॉक्रसी” अशी देशव्यापी ऑनलाइन मोहीम आयोजित केली आहे, असं वेणुगोपाल म्हणाले.
राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाला भाजपला जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह १९ काँग्रेस १९ बंडखोर आमदारांच्या आक्रमकतेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सचिन पायलट आणि भाजपच्या संगनमतामुळे राज्यात हे राजकीय संकट उद्भवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याखेरीज राजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपा त्यांच्या आमदारांविरोधात एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times