Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) कन्नड तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू (Death)  झाला आहे. शेतात गेलेल्या या दोन्ही बहिणी तीन दिवसांपासून बेपत्ता (Missing) होत्या. दरम्यान आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतातील जुन्या पडक्या विहिरीत या दोन्ही बहिणींचा मृतदेह आढळून आला आहे. स्वाती दत्तू चव्हाण (वय 19 वर्षे) आणि शितल दत्तू चव्हाण (वय 15 वर्षे) असे या दोन्ही बहिणींची नावं आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी शनिवार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या कडेला असलेले गिन्नी गवत जनावरांसाठी आणण्यासाठी स्वाती आणि शीतल या दोन्ही सख्ख्या बहिणी शेतात गेल्या होत्या. मात्र संध्याकाळ होऊन देखील या दोन्ही बहिणी घरी परतल्या नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शेतात जाऊन गिन्नी गवत असलेल्या ठिकाणी मुलींचा शोध घेतला. मात्र त्या दोघी कुठेही मिळून आल्या नाही. 

 दोन्ही बहिणीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले

शेतात आणि गावात सर्वत्र शोध घेऊन देखील दोन्ही मुली मिळून आल्या नसल्याने, घाबरलेल्या दत्तू बाबुराव चव्हाण यांनी आठ वाजेच्या सुमारास आपल्या मुली बेपत्ता झाल्याची कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान सोमवारी पुन्हा मुलींचा सर्वत्र शोध घेणे सुरूच होते. याचवेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नातेवाईक मुलीचा शोध घेत असताना, शेजारच्या शेतातील (गट क्रमांक 170) जुन्या पडक्या विहिरीत स्वाती आणि शितल या दोन्ही बहिणीचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. 

news reels

पोलिसांची घटनास्थळी धाव…

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह ग्रामस्थांच्या व नातेवाईकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही बहिणींचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चिकलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तर वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

औरंगाबादच्या बंद कंपनीत आढळला तरुणाचा मृतदेह, दगडावर ठेवून केलं हत्याराने मुंडके धडावेगळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here