Agriculture News : सध्या राज्यात थंडीचा जोर (Cold Weather)वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा घसरत चालल्यानं थंडीत वाढ होत आहे. ही वाढती थंडी काही पिकांसाठी (Agriculture Crop) चिंतेचा विषय ठरत आहे, तर काही पिकांसाठी थंडीचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं हरभरा पिकासाठी (Gram Crop) पोषक वातवरण तयार झालं आहे. त्यामुळं बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात सध्या हरभरा पिकाची स्थिती चांगली आहे. त्यामुळं यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड

राज्यात सामान्यतः विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड केली जाते. यंदा राज्यात सरासरीच्या 100 टक्के हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाली आहे. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं खरिपात कुठे अतिवृष्टीमुळं तर कुठे रोगाराईमुळे पिकांचं झालेल्या नुकसानामुळं शेतकरी हवालदील झाला होता. मात्र, आता हरभऱ्याची पिकाची स्थिती चांगली असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  

बुलढाणा जिल्ह्यात 2 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड

यावर्षी शेतकऱ्यांना हरभऱ्याच पीक तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 1 लाख 46 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड होत असते. पण यंदा पोषक हवामान असल्यानं शेतकऱ्यांनी जवळपास 2 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड केली आहे. हरभरा पिकाच्या लागवडीत सरासरीच्या 139 टक्के वाढ झाली  आहे. त्यामुळं यंदा रब्बीतील हरभरा शेतकऱ्यांना तारणार असल्याचं चित्र दिसत आहे. 

काही ठिकाणी बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका

वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या वातावरणातील बदलाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे थंडी आणि तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात वाशिम (Washim) जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळं आणि धुक्यामुळं हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळं हरभरा पिकासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. 

news reels

महत्त्वाच्या बातम्या:

Washim News: वाशिम जिल्ह्यात रब्बी पिक धोक्यात, हरभरा पिकावर मर रोग आल्याने शेतकरी अडचणीत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here