कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात , जिल्ह्यानंतर जिल्हा करोनासाठी नवा हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यात रुग्णांची वेगाने वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन १५ दिवस परजिल्ह्यातून जिल्ह्यात येण्यास बंदी घालतानाच कडक लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले. हा उद्या संपत असून लॉकडाऊन वाढवला जाणार का, हा प्रश्न संपूर्ण कोल्हापूरकरांना पडला आहे. या कळीच्या प्रश्नावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. ( On )

कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवला जाणार नाही, असे स्पष्ट करत सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचवेळी करोनाची एकंदर स्थिती लक्षात घेता उद्या रविवारी लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारपासून काही नियम अतिशय कडक केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. हे कडक नियम काय असणार आहेत, हे उद्याच प्रशासनाकडून स्पष्ट केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क सक्तीबाबत नव्याने निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. १५ दिवसांसाठी ही प्रवेशबंदी आहे. त्यासोबतच जिल्ह्यात २० ते २६ ऑगस्टदरम्यान कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, या लॉकडाऊन काळातही करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ४०६ नवीन करोन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहचली आहे. मृतांचे आकडेही चिंता वाढवणारे आहेत. जिल्ह्यात आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ११२ वर झाली आहे. ही स्थिती पाहता लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासन नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहे, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here