Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. तसेच मुंबईतही (Mumbai) थंडी वाढली आहे. 
 
गेल्या दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळं राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. 

पाहुयात कुठे किती तापमानाची नोंद? 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

पुणे – 10.2
सांताक्रुज – 15.2
नागपूर – 14.3
सोलापूर – 16.2
सातारा – 19.1
डहाणू – 14.1
नांदेड -16.8
उदगीर – 16
औरंगाबाद – 11
कुलाबा – 18
कोल्हापूर -16.9
उस्मानाबाद – 16
रत्नागिरी – 16.6
माथेरान – 14.4
मालेगाव – 14.6
जळगाव – 10.2
जालना – 11
महाबळेश्वर – 13.5
नाशिक – 9.6
परभणी – 15.2

उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नाशिकम्ये 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुण्यातही 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मराठवड्यातही कडाक्याची थंडी पडली आहे. औरंगाबादमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

news reels

वाढती थंडी हरभरा पिकासाठी फायद्याची 

वाढत्या थंडीमुळं हरभरा पिकासाठी (Gram Crop) पोषक वातवरण तयार झालं आहे. त्यामुळं बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात सध्या हरभरा पिकाची स्थिती चांगली आहे. त्यामुळं यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सामान्यतः विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड केली जाते. यंदा राज्यात सरासरीच्या 100 टक्के हरभऱ्याची रेकॉर्ड ब्रेक लागवड झाली आहे. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं खरिपात कुठे अतिवृष्टीमुळं तर कुठे रोगाराईमुळे पिकांचं झालेल्या नुकसानामुळं शेतकरी हवालदील झाला होता. मात्र, आता हरभऱ्याची पिकाची स्थिती चांगली असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Mumbai Coldest Temperature : मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here