Aurangabad Suicide News: मित्रा सारख्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने दुसऱ्या भावानेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली असल्याची घटना औरंगाबादच्या गजानननगर परिसरात समोर आली आहे. दरवर्षी भाऊ आणि तो सोबत पतंग उडवायचे. यंदाच्या संक्रांतीला भाऊ सोबत नव्हता. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी अपघातात मृत झालेल्या तरुणाच्या भावाने मकरसंक्रांतीच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ऋषिकेश गणेश धांडगे (वय 17 वर्षे, रा. गल्ली क्र. 9, गजानननगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश धांडगे हा लाडगाव येथे अकरावीचे शिक्षण घेत होता. दरम्यान 29 नोव्हेंबररोजी सकाळी सहा वाजता ऋषिकेशचा भाऊ रोहित धांडगे हा कंपनी कामाला जात होता. तेव्हा रस्ता चुकलेल्या मिठाच्या ट्रकने छावणी रेल्वे उड्डाणपूलाजवळील लक्ष्मी माता मंदिरासमोर रोहितला चिरडले होते. यात तो जागीच ठार झाला होता. या घटनेचा ऋषिकेशला प्रचंड धक्का बसला. तेव्हापासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. 

दरम्यान ऋषिकेश सतत शांत राहायचा. तर दोघे भाऊ दरवर्षी मकरसंक्रांतीला पतंग उडवायचे. यंदाच्या मकरसंक्रांतीला त्याचे अनेक मित्र पतंग उडवित होते. ऋषिकेश भाऊ मात्र यात नव्हता. त्या नैराश्यातून ऋषिकेशने रविवारी रात्री घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच शेजाऱ्यांच्या मदतीने ऋषिकेशला घाटीत नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री पावणेअकरा वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सतत चिंतेत असायचा…

ऋषिकेश धांडगे आणि त्याचा भाऊ रोहित दोन्ही एकमेकांचे मित्र असल्यासारखे राहायचे. घरात देखील दोन्ही भाऊ प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करायचे. बऱ्याचदा ते सोबत राहायचे. सणासुदीच्यावेळी देखील या दोन्ही भावातील एकमेकांवरील प्रेम दिसून यायचा. त्यामुळे रोहितचा अपघाती मृत्यू झाल्यावर ऋषिकेशला मोठा धक्का बसला होता. रोहितच्या जाण्याने तो नेहमी चिंतेत असायचा. सतत शांत राहणारा ऋषिकेश नेहमी स्वतःला एकटा ठेवत होता. दरम्यान यंदाच्या मकरसंक्रांतीला रोहितचे अनेक मित्र पतंग उडवित होते. ऋषिकेश भाऊ मात्र यात नव्हता. त्यामुळे या नैराश्यातून ऋषिकेशने रविवारी रात्री घरात गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

news reels

परिसरात शोककळा 

गणेश धांडगे हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिवार्ह करतात. त्यांना रोहित आणि ऋषिकेश ही दोन मुले होती. रोहितचा दीड महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. 15 जानेवारीला दुसरा मुलगा ऋषिकेशने आत्महत्या केल्याने धांडगे दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दीड महिन्यात त्यांची दोन्ही मुले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

दुर्दैवी! दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here