मुंबई: संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराची आज हिरव्या चिन्हात सुरुवात झाली आहे. बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०.३३ अंकांनी वाढून ६०,११३ च्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७.६५ अंक म्हणजेच ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह १८,९२२ वर व्यवहार करत होता.

शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली?
किंचित वाढीसह शेअर बाजाराची सुरुवात झाली असून बीएसईचा सेन्सेक्स ४९.११ अंक किंवा ०.०८२ टक्क्यांनी किंचित वाढून ६०,१४२ अंकांवर खुला झाला. तर त्याच वेळी एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक, निफ्टीने आज २७.९५ अंक किंवा ०.१६ टक्क्यांच्या वाढीसह १७,९२२.८० वर सुरुवात केली.

बंपर कमाईची संधी! मोठ्या समूहाच्या प्रमुख कंपनीचे FPO च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आजच्या सकाळच्या व्यापार सत्राच्या सुरुवातीला निफ्टीच्या मीडिया, मेटल, फार्मा, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर इंडेक्समध्ये घसरणीसह व्यवसाय होताना दिसत आहे. त्याच वेळी सेक्टरमध्ये आज बँक, ऑटो, ऑइल अँड गॅस, आयटी, एफएमसीजी, फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये तेजी दिसून येत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती
सकाळच्या व्यापार सत्रात आज सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग तेजीसह तर ९ समभागात घसरून व्यवहार होत आहे. याशिवाय निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३१ समभाग तेजीत असून १९ समभागात घसरण दिसत आहे. तसेच बँक निफ्टीमध्ये आज ४२,२०० अंकांच्या वरच्या पातळी दिसत आहे.

Aristo Biotech SME चा आयपीओ आजपासून खुला, तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले का? घ्या जाणून किंमत बँड आणि इतर तपशील

कोणते शेअर्स वधारले
आजच्या सुरुवातीच्या व्यवहार सत्रात एचयूएल, एचसीएल टेक, L&T, टाटा मोटर्स, एनटीपीसी, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, आशियाई पेंट्स, रिलायन्स, इन्फोसिस, कोटक बँक, टीसीएस, आयटीसी, एसबीआय, पॉवरग्रिड, ॲक्सिस बँक, नेस्ले, बजाज फायनान्स, विप्रो, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्राचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

Tata समूहाचा ‘सुपरहिट’ शेअर स्वस्त झालाय; बिग बुलची मोठी गुंतवणूक, काय सांगतायत एक्स्पर्ट्स
सोमवारीची स्थिती
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार आपली आघाडी कायम ठेवू शकला नाही आणि सेन्सेक्स १६८ अंकांनी घसरून बंद झाला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार बाजारातून सतत बाहेर पडणे आणि निर्देशांकातील मजबूत घटक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज व एचडीएफसी बँकेच्या समभागांमधील घसरणीमुळे बाजार लाल चिन्हात बंद झाला.

सेन्सेक्स १६८.२१ अंक म्हणजेच ०.२८ टक्क्यांनी घसरून ६०,०९२.९७ अंकांवर बंद झाला. एक क्षणी निर्देशांकाने वेग धरला होता, मात्र नंतर निर्देशांकात घसरला. त्याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६१.७५ अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी घसरून १७,८९४.८५ वर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here